यवतमाळमध्ये संशयित आरोपीचा पोलिसाच्या मारहाणीत मृत्यू - yavatmal crime update
यवतमाळ - दारव्हा येथे एका संशयित आरोपीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. आरोपीच्या मृत्यूनंतर संतप्त जमावकडून पोलीस ठाण्यावर आणि वाहनावर दगडफेक झाली आहे. मात्र, यात दोन ते तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. तीरोडा येथील शेख इरफान शेख शब्बीर(27) तरुणाला पोलिसांनी दारव्हा शहरातील रेल्वे स्टेशन रोड चौफुली येथुन गांजा विक्री करत असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले होते. यावेळी आरसीपी पथक दारव्हा शहरात दाखल झाले. जखमी पोलिसांना दारव्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी दिग्रस, यवतमाळ या ठिकाणावरून अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दरणे, जयंत देशपांडे, तहसीलदार सुभाष जाधव, पोलीस उपनिरीक्षक भारत लसंते यांनी दंगल नियंत्रक पथकाकडून शहरात शांतता राखली.