TET Exams Cancelled : 2020 साली झालेली टीईटी परीक्षा रद्द करा; विद्यार्थ्यांची मागणी - टीईटी परिक्षा पेपरफुटी
पुणे :- आरोग्य भरती पेपरफुटी नंतर म्हाडा (MHADA Paper leak) आणि आता टीईटीत देखील पेपरफुटी स्पष्ट झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे. 2020मध्ये झालेल्या टीईटीपरीक्षेच्या उत्तर पत्रिकेत तफावत असल्याचं त्यावेळेस काही विद्यार्थ्यांनी आरोप केला होता. या परीक्षेत गौरप्रकार उघड झाल्यानंतर टीईटी परीक्षा दिलेले विद्यार्थी समोर आले आहे.आणि या विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून या परीक्षेच्या संदर्भात एजंटकडून दीड ते दोन लाख रुपयांची मागणी होत असल्याचा आरोप देखील या विद्यार्थ्यांनी केलं आहे. टीईटी परीक्षा देण्याऱ्या तुषार देशमुख आणि अश्विनी कडू यांच्याशी बातचीत केलीय 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने