VIDEO : एस टी कर्मचाऱ्यांचे मुंडन आंदोलन - एसटीचे आगार बंद
पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होताना दिसून येत आहे. काल शहरात स्वारगेट आगारातील कर्मचाऱ्यांच्या वतीने जागरण गोंधळ करून आंदोलन करण्यात आला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वतीने मुंडन करून हे आंदोलन करण्यात आले आहे. राज्य सरकारने 943 कर्मचारी निलंबित करू नये. जेवढे एक लाखाहून अधिक कर्मचारी आहेत त्या सर्वांना निलंबित करा. कारण सर्वच कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेले आहे. आमच्या मागण्या मान्य करा अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली आहे. याचाच आढावा घेतला आहे, 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी....