महाविकास आघाडी सरकार वर्षपूर्ती: नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची 'विशेष मुलाखत'
महाविकास आघाडी सरकार आज एक वर्ष पूर्ण करत आहे. या पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. राज्य सरकारने पूर्ण केलेले सत्तेचे एक वर्ष हे समाधानकारक आहे. यापुढे देखील मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरूच राहतील, असे सांगताना शिंदे यांनी आगामी काळात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच मराठा आरक्षण, वाढीव वीजबिल, कोरोना काळातील परिस्थिती या मुद्द्यांवर चर्चा केली.