महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

गोव्यातील पक्ष सोडणाऱ्या आणि पक्षात घेणाऱ्या दोघांनाही लाज नाही; ही जनतेची फसवणूक- संजय राऊत - गोवा विधानसभा लढवणार शिवसेना

By

Published : Sep 29, 2021, 11:43 AM IST

मुंबई - लहान-लहान राज्यात सरकार आणून किंवा लोकप्रतिनिधी फोडून सत्तेचा खो-खो खेळ सुरू असून सध्या गोव्याच्या जनतेची फसवणूक सुरू आहे. जे निवडून आले आहेत ते पक्ष बदल करत आहेत आणि ज्या पक्षात जात आहेत, त्यांना लाज नाही असे म्हणत संजय राऊत यांनी गोव्यातील राजकीय घडामोडींवरून काँग्रेस आणि भाजपवर अप्रत्येक्षपणे निशाणा साधला आहे. भाजपाकडून सध्या पक्ष फोडले जातात आणि सत्ता हस्तगत केली जात आहे. महाराष्ट्रात आम्ही पक्ष फोडले नाहीत, तर आम्ही तीन पक्ष एकत्र आलो, असे म्हणत राऊत यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले. गोव्यात पुढील निवडणुकीत आप, तृणमूल सारखे पक्ष निवडणूक लढवणार आहेत, शिवसेनेची गोव्यात ताकद आहे. आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीत 22 जागा लढवणार आहोत. सध्याचे गोव्याचे सरकार रोज नवीन थापा मारत आहे. गोव्यात ड्रग्स आणि कॅसिनोचा बाजार सुरू आहे. याच कॅसिनोच्या विरुद्ध प्रचार करून भाजप सत्तेवर आले. मात्र आता तेच त्यांच समर्थन करत आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details