येवल्यात शिवसैनिकांनी केले केंद्रीय मंत्री राणे यांच्या पुतळ्याचे दहन - Chief Minister Uddhav Thackeray
येवला (नाशिक) - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद येवल्यातही उमटले आहेत. विंचूर चौफुली येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांचा पुतळा जाळून त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. यावेळी शिवसैनिकांनी नारायण राणे विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच नारायण राणे यांनी परत असे वक्तव्य केल्यास युवा सेना त्यांना सोडणार नाही. असा इशारा युवा सेनेचे नेते कुणाल दराडे यांनी दिला. यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे, संभाजी पवार, कुणाल दराडे, राजेंद्र लोणारी, ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.