School Reopen : नाशकातील शाळांमध्ये पहिल्या दिवशी 20 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती - First day of school
नाशिक - कोरोनामुळे तब्बल 18 महिन्यानंतर शाळेची घंटा वाजली, आज (सोमवार) पहिल्या दिवशी शाळेत 8, 9, 10 वीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र पहिल्या दिवशी सर्व सरकारी आणि खाजगी शाळेत केवळ 20 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली. सर्व शाळांनी कोरोना काळात शासनाने नमूद केलेल्या नियमांचे पालन केल्याचे दिसून आले. यावेळी खूप महिन्यानंतर विद्यार्थी शाळेत आल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण होते. वर्गात एका बँचवर एक विद्यार्थी अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच शाळेत येताना विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनाही मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. यावेळी शिक्षकांनी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन तर घरी असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने एकाच वेळी शिक्षणाचे धडे दिले. नाशिकच्या बॉईज टाऊन या शाळेतून ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने आढावा घेतला आहे.