बेळगावात एकीकरण समितीतीत फाटाफूट करून भाजपा सत्तेत - संजय राऊत - बेळगाव महापालिका निवडणूक भाजपा विजयी
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा येथे औरंगजेबाने कैद केले होते, तेव्हा महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती. तरी महाराष्ट्रातील काही लोकांनी आनंद व्यक्त केला होता, तसा महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगाव महानगर पालिकेत पराभव झाला. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना दुःख आहे. एकीकरण समितीचा पराभव झाला म्हणून भाजपाने पेढे वाटले, हे 105 हुतात्म्यांचे दुर्दैव आहे. एकीकरण समितीत फाटाफूट केली, वार्ड पुनर्रचना केली, प्रचाराला वेळ मिळू दिला नाही. तरीही संघर्ष केला जेलमध्ये गेले त्यांचे कौतुक केले पाहिजे. फाटाफूट घडवून भाजपा निवडून आला. सत्तेचा दुरुपयोग झाला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.