महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

'गुजरातमध्ये कमजोर सरकार असल्यामुळे मोदी तिथला दौरा करत असतील' - संजय राऊत ऑन गुजरात दौरा

By

Published : May 19, 2021, 12:32 PM IST

मुंबई - चक्रीवादळाचा फटका गोवा, महाराष्ट्रासह गूजरातलाही बसला आहे. पंतप्रधानांचे गृहराज्य असल्याने ते गुजरातला जातीलही. कदाचित केंद्र सरकारला वाटत असेल की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व संकटांचा सामना करण्यासाठी समर्थ आहेत. त्याचबरोबर सर्व संकटांशी सामना करणारे नेतृत्व म्हणजे उद्धव ठाकरे यांची कदाचित पंतप्रधानांना खात्री पटली असेल. तसेच गुजरात मध्ये कमजोर सरकार असल्यामुळे मोदी कदाचित तिथला दौरा करत असतील, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. पुढे ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन केले पाहिजे, ज्या प्रकारे त्यांनी ज्योतिष सांगण्याचा व्यवसाय उघडला आहे. तर त्यांना चारशे जागा देखील मिळू शकतात, पाचशे देखील मिळू शकतात किंवा जगभरातल्या सगळ्या पार्लमेंटच्या जागा देखील ते जिंकू शकतात. सध्या राजकीय भविष्य वर्तवण्यापेक्षा करोना काळात लोकांचे भविष्य घडविणे जास्त गरजेच आहे, असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details