संभाजीराजे आणि बाळासाहेब थोरात यांची भेट - मराठा आरक्षणा बद्दल बातमी
मुंबई - मराठा समाज वाईट परिस्थितीमधून चालला आहे. समाज दु:खी आहे. या सर्व गोष्टी बाळासाहेब थोरातांच्या कानावर टाकल्या आहेत. आमची चर्चा सकारात्मक झाली. मार्ग कसा काढायचा यावर चर्चा करायची आहे. खंबीरपणे बाबी पुढे कशा येतील यावर माझे लक्ष आहे, असे खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले. यावेळी त्यांनी खासदार शरद पवार यांच्या भेटीवरसुद्धा भाष्य केले. ते म्हणाले, की पवार साहेब यांच्यासोबत 2 मिनिटांची भेट काय आणि 10 मिनिट भेट काय, त्यांचा अनुभव जास्त आहे. ते बाळासाहेब थोरात यांच्या भेटीनंतर बोलत होते.