बाबासाहेब पुरंदरेंच्या अस्थींचे किल्ल्यांवर विसर्जनास संभाजी ब्रिगेडचा विरोध, दिले हे कारण.. - संभाजी ब्रिगेड
औरंगाबाद : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे अकरा किल्ल्यांवर विसर्जन करण्यास संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शविला आहे. बाबासाहेब पुरंदरेंनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी राजे यांची लिखाणाच्या माध्यमातून बदनामी केल्याचा आरोप करत त्यांच्या अस्थींचे कोणत्याही गडावर विसर्जन करू देणार नाही अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. तसा प्रयत्नही कुणी करू नये. तसा प्रयत्न केल्यास, संभाजी ब्रिगेड स्टाईलने धडा शिकविला जाईल असा इशारा संघटनेने दिला आहे. त्यांचा गडावरून कडेलोट ही होऊ शकतो. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल असा इशारा संभाजी ब्रिगेड प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी दिला आहे.
Last Updated : Nov 17, 2021, 12:36 PM IST