आरक्षणाच्या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयासमोर आरपीआयचा मोर्चा - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मुंबई
मुंबई/बोरीवली - महाराष्ट्रातील राज्य सरकारने पदोन्नती आरक्षणात जी भूमिका घेतली आहे, त्यात पदोन्नतीत मागासवर्गीयांना आरक्षण मिळालेच पाहीजे, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बोरीवली पश्चिमेतील तहसीलदार कार्यलयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. यावेळी महाआघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी शिष्टमंडळ भेट घेणार असून, त्यांच्यासमोर आपल्या मागण्या सादर करणार आहे.