महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : 3 कोटी 45 लाख रुपयांचा गांजा जप्त - etv bharat live

By

Published : Oct 18, 2021, 10:23 PM IST

वाशिम - बुलडाणा जिल्ह्यातून वाशिमच्या रिसोड मार्गावर गांजाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती रिसोड पोलिसांना मिळाली. त्यानंतर रिसोड पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली असता जनावरांचा चारा घेऊन जाणारा टेंपो पकडला. त्यामध्ये पोलिसांनी 11 क्वींटल 50 किलो गांजा जप्त केला आहे. यात चालकांसह अन्य तीन जणांना रिसोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पकडलेला गांजा 3 कोटी 45 लाख असून तर टेंपोची किंमत 20 लाख असा एकूण 3 कोटी 65 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास रिसोड पोलीस करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details