VIRAL VIDEO : पाण्यात अडकलेल्या मुलांची जेसीबीच्या सहाय्याने सुटका - औरंगाबाद पाऊस बातमी
औरंगाबाद - जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ढेकू नदीला पूर आल्याने नदीच्या पलीकडे अडकलेल्या मुलांची जेसीबीच्या साहाय्याने केली सुटका केल्याचा व्हिडीयो समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील ढेकू नदीला पूर आला. या पुरामुळे नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूने काही मुलं अडकल्याने जेसेबीची मदत घेण्यात आली. जेसीबीच्या फावड्यात बसवून पुराच्या पाण्यातून मुलांनी प्रवास केला.