mumbai police route march अमरावती जिल्ह्यातील हिंसक घटनेनंतर मुंबईत पोलीस आणि आरएएफचा रूट मार्च - Borivali Police Route March
मुंबई - अमरावती (amravati violence) वाशीम, मालेगाव या ठिकाणी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर शहरात कोणत्याही प्रकारची दंगल होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांच्या (mumbai police) वतीने विशेष काळजी घेतली जात आहे. दंगल विरोधी पथक, पोलीस कर्मचारी यांच्या वतीने बोरिवली, कांदिवली, मलाड परिसरात लॉग मार्च (mumbai police route march) काढून जनजागृती करण्यात आली आहे. बोरिवली पोलीस (Borivali Police Route March) आणि आरएएफच्या (raf route march) जवानांनी बोरिवली आणि गोराई भागात 6 किलोमीटरचा मार्गक्रमण करून ताकद दाखवली. बोरिवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणाले की, लोकांना जागरूक करण्यासाठी हा रूट मार्च (route march mumbai) काढण्यात आला आहे, जनतेने कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, बोरिवली पोलीस आणि निमलष्करी दल सदैव तुमच्या पाठीशी आहे, असा संदेश आम्ही जनतेला देत आहोत.
Last Updated : Nov 16, 2021, 4:06 PM IST