पुणे ट्राफिक पोलिसांचा अजब कारभार; कारवाईची ही पद्धत किती योग्य? - पुणे वाहतूक पोलीस
पुणे शहरातील ट्रॅफिक पोलीस हे विविध कारणाने नेहेमीच चर्चेत असतात. अशातच पुण्यात घडलेल्या एका घटनेने पुण्यातील ट्राफिक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.रस्त्याच्या कडेला गाडीवर एक महिला बसलेली असताना त्या महिलेवर ट्राफिक पोलिसांच्यावतीने कारवाई करण्यात येत होती. यावेली एक पत्रकार या घटनेचा व्हिडिओ काढत होता. व्हिडिओ काढत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी अर्वाच्य भाषा वापरली आणि कारवाई न करताच पोलीस निघून गेले. हा पूर्ण घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे.