VIDEO : पुण्यात दिवाळीसाठी नागरिकांकडून स्वदेशी पूजा साहित्याला जोरदार मागणी - swadeshi puja sahitya pune
पुणे - दिवाळी उत्सवाला सुरुवात झालेली आहे. सगळीकडे खरेदीची लगबग असून नागरिकांच्या गर्दीने बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीत स्वदेशी आणि चीनी वस्तूंमध्ये नेहेमी संघर्ष पाहायला मिळते. स्वदेशी आणि चायनीज वस्तूंच्या या संघर्षात पुणेकरांनी यंदा स्वदेशीचा नारा दिला आहे. दोन वर्षांपूर्वी पूजा साहित्यांमध्ये चायनीज वस्तूंचा समावेश करण्यात आला होता. मात्र, नागरिकांनीच या वस्तूंना नाकारल्याने आजही बाजारात स्वदेशी वस्तूंचीच चलती आहे. पुण्यातील गंजीवाले यांचे बाजीराव रोडवर पूजा साहित्याचे दुकान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या दुकानात विविध पूजा साहित्य विक्रीसाठी आहे. हे सर्व साहित्य स्वदेशी असून नागरिकांकडून या स्वदेशी पूजा साहित्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. याचा आढावा घेतला ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने.
Last Updated : Nov 4, 2021, 11:23 AM IST