महाराष्ट्र बंद : पुण्यातील मार्केटयार्ड, पीएमपीएमएल सेवेचाहा कडकडीत बंद - पुण्यात महाराष्ट्र बंदला प्रतिसाद
पुणे - लखीमपूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकासआघाडी सरकार तसेच विविध संस्था संघटनेच्या वतीने बंद पुकारण्यात आला आहे. या महाराष्ट्र बंदला पुण्यात सकाळच्या सत्रात चांगला प्रतिसाद मिळाला असून पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीदेखील आज पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. रविवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बंद जाहीर करण्यात आल्याने व्यापारी तसेच शेतकऱ्यांची गौरसोय झालेली नाही. मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने आणलेला माल हा बाजार समितीत तसाच तस पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या बंदच्या पार्श्वभूमीवर पुण्याची सार्वजनिक वाहतूक सेवा असलेली पीएमपीएमएल देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून बंद करण्यात आली आहे. पीएमपीएमएल सेवा बंद झाल्याने मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होणार आहे. या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मार्केटयार्ड येथून आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी घेतलेला आढावा...