मुंबईच्या स्नेहल राणे यांनीही घेतली लस - बीकेसी लसीकरण मुंबई
मुंबई- राज्यात आज कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाची सुरुवात झाली आहे. मुंबईतील बीकेसी कोव्हिड सेंटरमध्ये थोड्याच वेळात लसीकरणाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यातील लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. त्यानुसार बीकेसी कोविड सेंटरमध्ये नोंदणी करण्यात आलेले कोरोना योद्धे ज्यांना आज लस दिली जाणार आहे, ते हळूहळू जमण्यास सुरुवात झाली आहे. या सेंटरमध्ये लस घेण्याचा मान मिळाला आहे तो मुंबई महानगर पालिकेत परिचारिका म्हणून सेवा देणाऱ्या स्नेहल राणे यांना मिळाला आहे. आज त्या सर्वात आधी पहिली लस घेणार असून त्या खुश आहेत. तर त्यांनी ही लस सुरक्षित असल्याचे म्हणत मुंबईकारांनी बिनधास्त लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. राणे आणि इतर लस घेणाऱ्या कोरोना योद्ध्यांशी ईटीव्ही भारतने संवाद साधला आहे.
Last Updated : Jan 16, 2021, 7:44 PM IST