अखेर 10 दिवसानंतर बाजार समित्या सुरू; मात्र, कांदा उत्पादकांच्या पदरी निराशाच - Market Committee Nashik latest news
मनमाड (नाशिक) - जिल्ह्यात दहा दिवसांनंतर बाजार समित्या सुरू झाल्याने कांद्याची बंपर आवक झाली आहे. परिणामी कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. केवळ ७०० ते ८०० रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव मिळत आहे. मात्र, या भावात काहीच परवडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. किमान कांद्याला 1500 ते 2000 रुपये भाव मिळावा, अशी मागणी बळीराजा करत आहे.