Pune New Year : पुण्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त; 'ई टीव्ही भारत'ने पोलीस आयुक्तांसोबत साधला संवाद - नववर्षासाठी पुण्यात पोलीस बंदोबस्त कडक
पुणे - 2021 ला निरोप देताना 2022 या नववर्षाच्या स्वागताला (New Year Celebration Pune) यंदाही कोरोनामुळे निर्बंध आले आहेत. शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन करावे. नागरिकांनी घरी बसूनच नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन पुणे पोलिसांनी (Pune Police) केले आहे. शहरात गर्दी होऊ नये म्हणून प्रत्येक झोनकडून त्यांच्या हद्दीतील बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्याच पद्धतीने शहरात एकूण 4 हजारहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, चौकाचौकात वाहनचालकांची तपासणी होणार आहे. तसेच रात्री जमावबंदी असल्याने नागरिकांना घरीच नववर्षाचे स्वागत करावे लागणार आहे. याबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. अमिताभ गुप्ता (Pune CP Dr. Amitabh Gupta) यांच्याशी प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी संवाद साधला आहे.