महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : पॉईंटमनच्या सतर्कतेमुळे वाचला प्रवाशाचा जीव; कल्याण स्थानकावरील घटना CCTV मध्ये कैद - pointman saves a man from going under train

By

Published : Nov 16, 2021, 3:52 PM IST

ठाणे : कल्याण रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म सोडलेली एक्स्प्रेस पकडण्याच्या प्रयत्नात घसरून पडलेल्या एका प्रवाशाचे प्राण पॉईंटमनच्या सतर्कतेमुळे वाचले आहेत. धावती एक्सप्रेस पकडताना हा प्रवासी घसरून पडला होता. यावेळी प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमध्ये अडकून तो ओढला जात होता. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पॉईंटमन शिवजी सिंग यांनी तत्काळ धाव घेत त्या प्रवाशाला तिथून खेचून बाहेर काढले. तोपर्यंत इतर प्रवाशांनी आरडाओरडा करत चेन ओढल्याने रेल्वेही थांबली होती. ही घटना स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेत प्रवाशाचे प्राण वाचविणाऱ्या सिंग यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक केले जात आहे. दरम्यान, गेल्या पाच महिन्यांतील ही पाचवी घटना असल्याचे सांगितले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details