करवीर निवासिनी अंबाबाईची आज 'वैष्णवी मातृका' रुपात पूजा - navratri news
कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी करवीर निवासिनी आई अंबाबाईची वैष्णवी मातृका रुपात पूजा बांधण्यात आली. सप्तमातृका संकल्पनेतील ही मातृका सृष्टीचे पालन करता भगवान विष्णूची शक्ती आहे. वैष्णवी मातृका गरुडावर बसलेली असून तिने शंख चक्र गदा आणि कमळ हातामध्ये धारण केलेले आहे. भगवान विष्णू प्रमाणे ती दागिन्यांनी किरीट मुकुंद त्यांनी सजलेली आहे. सोमवारी आकर्षक पद्धतीने अंबाबाईची वैष्णवी मातृका रुपातील सालंकृत पूजा बांधण्यात आली. ही पूजा श्रीपूजक मयूर मुनिश्वर, सोहम मुनिश्वर आणि अरुण मुनिश्वर यांनी बांधली. दरम्यान, आज सुद्धा मोठ्या संख्येने भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले.