Pandharpur Wari 2021: संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट
आळंदी (पुणे) - आषाढी एकादशीच्या निमित्ताने अलंकापुरीत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात पहाटे समाधीवर दुग्धाभिषेक करत महाआरती करण्यात आली. यावेळी वीणा मंडप आणि समाधी मंदिराला (गाभारा) विविध रंगाच्या फुलमाळांनी सजविण्यात आले होते. समाधी मंदिरातील दृश्य अत्यंत विलोभनीय असून प्रत्येक एकादशी निमित्ताने माऊलींच्या गाभाऱ्याला फुलांची आकर्षक सजावट केली जाते. माऊली मंदिरात केलेली ही सजावट पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य भाविक याठिकाणी दाखल होतात. परंतु यावर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे यंदा भाविकांना घरातूनच ऑनलाइन दर्शन घ्यावे लागत आहे. देवस्थानं बंद असले तरी मंदिरांमध्ये पूजा, फुलांची आरास अशा विधी नित्यनेमाने सुरू असल्याची माहिती देवस्थानचे व्यस्थापक माऊली वीर यांनी दिली आहे.