कोरोनानंतरही धोका कायम - डॉ. ए. एम. देशमुख यांची खास मुलाखत - corona crisis
मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी इंडियाचे प्रेसिडेंट डॉ. ए. एम. देशमुख यांनी कोरोनासंदर्भात महत्वपूर्ण भाष्य केले आहे. कोरोनाचा आज धोका आहे. तो कमी होईल. मात्र यापुढेही अशाप्रकारच्या साथी जीवाणू आणि विषाणूजन्य रोगाचे सावट जगावर राहील. त्यासाठी आतापासूनच तयारी करणे गरजेचे आहे. जैविक युद्धाचे संकटही जगावर आहे. त्यादृष्टीनेही सावधगिरी बाळगली पाहिजे असेही स्पष्ट मत डॉ. देशमुख यांनी मांडले आहे. कोरोना सध्या कोणत्या टप्प्यावर आहे. याचबरोबर डेल्टाचा किंवा इतर व्हेरिएंटचा धोका किती. लसीकरणानंतरही काय काळजी घ्यावी? आगामी संकटाची तयारी कशी करावी? या आणि अशा प्रश्नांची डॉ. देशमुख यांनी दिलेली उत्तरे आवश्य ऐका.
Last Updated : Aug 21, 2021, 2:49 PM IST