Pune New Year Celebration : पुण्यातील तरुणाईचा सरत्या वर्षाला जल्लोषात निरोप - पुण्यात नववर्षाचे जल्लोषात स्वागत
पुणे - 31 डिसेंबर म्हणजेच नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील तरुणाई जल्लोषात सरत्या वर्षाला निरोप देत आहे. तसेच येणाऱ्या वर्षाचा चांगला संकल्प देखील राबवण्यासाठी तरुणाई तयार आहे. फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर पुण्यातील नागरिक दाखल होऊन जल्लोष करत आहेत. तसेच जनजागृतीसाठी मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयातर्फे सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला दारू नको दूध प्या, असे पथनाट्य देखील येथे राबवले गेले.