महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

जय मोदी बाबा! वाढत्या महागाईच्या विरोधात 'राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांनी केली पंतप्रधानांची उपरोधिक आरती - अमित शहा

By

Published : Aug 12, 2021, 8:28 AM IST

Updated : Aug 12, 2021, 9:40 AM IST

मुंबई - वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी येथे निदर्शने केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या फोटोवर एनसीपी महिला नेत्या ममता शर्मा यांनी फुलांचा हार अर्पण करुन त्यांची उपरोधिक आरती केली. नारळ फोडून फोटोसमोर त्यांनी 'सबके संकट हरणा, सबके अच्छे दिन लाना, जय मोदी बाबा' अशी उपरोधिक आरती केली. महागाईला विरोध करणाऱ्या एनसीपी महिला नेत्या ममता शर्मा यांनी सांगितले की, मोदी हे पंतप्रधान होण्यापूर्वी नेहमी महागाई कमी करू म्हणत होते. पेट्रोल डिझेलचे भाव कमी करू म्हणत होते. सगळ्यांचे अच्छे दिन येतील असा त्यांनी नारा दिला होता. मात्र, नरेंद्र मोजी हे पंतप्रधान झाल्यापासून आजपर्यंत त्यांनी कोणतेही वचन पूर्ण केलेले नाही. त्यांना त्यांनी दिलेल्या वचनांचा विसर पडला आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनाची स्मृती परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि निर्मला सीतारमण यांची पूजा करून त्यांची आरती करण्यात आली.
Last Updated : Aug 12, 2021, 9:40 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details