मुंबईत एनसीपी आणि कॉंग्रेस पक्षाची केंद्र सरकारविरोधात निदर्शने - 27 सप्टेंबर भारत बंद
मुंबई - केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायद्याच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने दंड थोपटले असून 27 सप्टेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी संघटना आणि डाव्या आघाडी बंदमध्ये सामील होणार आहेत. या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून देखील पाठिंबा देण्यात आला आहे. मुंबईतील सायन सर्कल परिसरामध्ये केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात निदर्शने केली जात आहे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे आणि या कृषी कायद्यामुळे सामान्य माणूस आणि शेतकरी अडचणीत सापडला आहे. केंद्र सरकारने हे तीन कृषी कायदे रद्द करावे यासाठी सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. सायन सर्कल परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आहे. याबाबत कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश रेड्डी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी...