नाना पटोले यांचे धक्कादायक विधान; मुंबई तुंबने हे काही नवीन नाही - Mumbai Water retention is nothing new
वाशिम - मान्सूनच्या पहिल्याच पावसात मुंबई तुंबली गेली. या प्रश्नाचे उत्तर देताना नाना पटोले यांनी मुबंई ही पावसाने तुंबली हे काय नवीन नाही. मुंबईत घनदाट लोकसंख्या आणि दाट वस्ती, यामुळे तिथं दरवर्षी पाणी मोठ्या प्रमाणात साचत असते. आता जे विरोधक आरोप करत आहेत, त्यांनी मागील पंचवार्षिकला मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता होती. मुख्यमंत्री ही भाजपचे होते, तेव्हा का उपाय योजना केल्या नाहीत. भाजपच्या काळात ही मुंबई तुंबायची, असे नाना पटोले हे वाशिम दौऱ्यावर असताना वाशिम इथ पत्रकार परिषदेत बोलत होते.मुंबई महापालिकाच नव्हे तर राज्यभरात आम्ही स्वबळावर लढणार आहोत, आम्ही जर मुंबई महापालिकेत सत्तेत आलो तर योग्य त्या उपाययोजना करू असे ही यावेळी नाना पटोले म्हणाले.