New Year Tekdi Ganpati Darshan : टेकडी गणपतीचे दर्शन घेऊन नागपूरकरांनी केली नववर्षाची सुरुवात - नागपुरातील टेकडी गणपती दर्शनासाठी गर्दी
नागपूर - नववर्षाची सुरुवात बाप्पाचे दर्शन घेऊन नागपूरकरांनी केली आहे. नागपूरकरांचे आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणेशाच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविकांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोरोनाचा धोका असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले होते.