VIDEO : सीएसएमटी स्थानकात 'रेस्टॉरंट ऑन व्हील' प्रवासी,पर्यटकांच्या सेवेत खुले! - mumbai
मुंबई - सीएसएमटी स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना आणि पर्यटकांना रेल्वेच्या डब्यात बसूनच खादयपदार्थांची चव चाखण्यासाठी 'रेस्टॉरंट ऑन व्हील' संकल्पना राबविण्यात आली आहे. वापरात नसलेल्या डब्यांचे रुपांतर उपाहारगृहात करण्यात आले आहे. सीएसएमटीच्या १८ नंबर प्लॅटफॉर्मबाहेर हे 'रेस्टॉरंट ऑन व्हील' साेमवारपासून प्रवासी,पर्यटकांच्या सेवेत खुले केले आहे. याचबरोबर लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, कर्जत, ईगतपुरी, लोणावळा, नेरळ या रेल्वे स्थानकातसुध्दा रेस्टॉरंट ऑन व्हील' सुरू करण्याचा रेल्वेचा विचार आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी 'रेस्टॉरंट ऑन व्हीलचे निरीक्षण केले.