मुंबईकरांकडून लॉकडाऊनला प्रतिसाद, लोकल, एसटी आणि बेस्टमध्ये गर्दी रोडावली - कोरोना मुंबई
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर १ मेपर्यंत राज्यात नियमांसह लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लोकल ट्रेन, मोनो, मेट्रो यांमधून सामान्य नागकरिकांचा प्रवासवर बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या दिवशीपासून सार्वजनिक वाहतूक व्यस्थामध्ये नियमाचे काटेकोर पालन होत असल्याचे चित्र दिसून आले आहे.