सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : मुंबई पोलीस आयुक्त यांची संपूर्ण पत्रकार परिषद... - मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग
मुंबई - आतापर्यंत ५६ लोकांचे जवाब नोंदवले आहेत. सुशांतसिंह राजपूतच्या मोबाईल व लॅपटॉपमधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. १५ जून रोजी फॉरेन्सिक टीम सुशांतच्या घरातून काही पुरावे घेऊन गेली होती. सुशांतचे आर्थिक व्यवहार तपासले आहेत. याप्रकरणी तपासात कोणालाही सूट देण्यात आली नसून, तपास सुरू आहे, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.