कंगना रणौत आज मुंबईत परतणार; पाहा विमानतळावरील परिस्थिती... - मुंबई विमानतळ आढावा कंगना रणौत
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून तिच्या बेताल वक्त्यांमुळे सतत चर्चेत आहे. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर शिवसेना विरुद्ध कंगना असे चित्र सध्या तयार झाले आहे. त्यातच तिच्या मुंबईतील ‘मणिकर्णिका फिल्म्स’ या कार्यालयात बेकायदेशीर काम केल्यामुळे बीएमसीने तिला पालिकेने नोटीसदेखील बजावली आहे. आज कंगना विमानाने चंदीगड वरून मुंबईत दाखल होणार आहे. तिला 'वाय' दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर सध्या काय परिस्थिती आहे, याचा आढावा घेतलाय ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी...