सरकारला लाज वाटली पाहिजे... खासदार नवनीत राणा यांची संतप्त प्रतिक्रिया - Student Travel Allowance Demand Navneet Rana
अमरावती - आज व उद्या होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षा अचानक रात्री रद्द केल्याने राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही संतप्त प्रतिक्रिया देत सरकारचा निषेध केला. तीन तिघाडी काम बिघाडी, सरकारला लाज वाटली पाहिजे, एक परीक्षा बरोबर घेऊ शकत नाही, अशी खरमरीत टीका नवनीत राणा यांनी राज्य सरकारवर केली. रात्री १० वाजता परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला तर, परीक्षा सेंटरवर विद्यार्थी गेले, त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास भत्ता सरकारने दिला पाहिजे, अशी मागणीही नवनीत राणा यांनी केली.