महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

'राज्य सरकारनेच लोकं भाड्याने लावून दंगली घडविल्या' आमदार संतोष दानवेंचा आरोप - mla santosh danve accused state goverment for Violence in amravati

By

Published : Nov 22, 2021, 4:11 PM IST

जालना : राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी राज्य सरकारनेच लोकं भाड्याने लावून दंगली घडवल्या असा गंभीर आरोप भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी सोमवारी जालन्यात केला. या प्रकरणी राज्य सरकारवरच गुन्हा दाखल करावा अशी मागणी दानवे यांनी केली. या प्रकरणी रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांत बाचाबाचीही झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details