अडसूळांची संपत्ती जप्त करून खातेदारांचे पैसे परत करा - रवी राणा - महाराष्ट्र लेटेस्ट न्यूज अपडेट
अमरावती - शिवसेना नेते व माजी खासदार आनंदराव अडसूळ व त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांच्यावर मुंबईच्या निवासस्थानी सिटी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने समन्स देत धाडी टाकल्या होत्या. या दरम्यान आनंदराव अडसूळ हे आजारी पडले व ते रुग्णालयात दाखल झाले. यावर आमदार रवी राणा यांनी अडसूळांवर पुन्हा जोरदार टीका करत बिमारीच अडसूळ नाटक करत आहेत. त्यांनी मुंबईच्या सर्वसामान्य माणसाचे पैसे डुबवले आहेत. त्यामुळे ईडीने आनंदराव अडसूळ, मुलगा अभिजीत अडसूळ आणि जावई यांना अटक केली पाहिजे व अडसूळ यांची पूर्ण संपत्ती जप्त करून बँकेत पैसेत डुबलेल्या खातेदारांचे पैसे परत दिले पाहिजेत, अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे. शिवसेना ही अडसूळ यांची पाठराखण करत असून निःपक्षपातीपणे ईडीने कारवाई करावी, असेही रवी राणा यावेळी म्हणाले.