मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व काही समजून घेत योग्य निर्णय घेतील : मंत्री नितीन राऊत - minister nitin raut latest news
मुंबई : काँग्रेसच्या नाराज मंत्र्यांना अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ मिळाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे आज (गुरुवार) मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. याबाबत कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांच्यासोबत बातचीत केली असता, त्यांनी महाविकास आघाडीत सर्व आलबेल असून मुख्यमंत्री काँग्रेस नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतील आणि त्यावर उपाय काढतील, अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी दिली आहे.