Union Budget 2022 : केंद्रीय अर्थसंकल्पावर महाराष्ट्रातील मंत्र्याच्या प्रतिक्रिया
मुंबई - आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यावर आता राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोरोना महामारीमुळे आरोग्य विभागाला अर्थसंकल्पात भरीव तरतूद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, केंद्र सरकारने घोर फसवणूक केली आहे. शाळेसंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू केले होते. विद्यार्थी हित विचारात घेतला होता. मात्र, शिक्षणाला ऑनलाइन पर्याय होऊ शकत नाही. नोकरदार आणि मुंबईकर सर्वसामान्यांसाठी निराशाजनक -एकनाथ शिंदे कोरोना संकटामध्ये सर्वसाधारण नोकरदार वर्ग आहे त्याची अपेक्षा होती की कर्ज दरामध्ये सवलत मिळेल परंतु अशा प्रकारचा निर्णय झालेला नाही. आणि त्याचबरोबर दीर्घकालीन गुंतवणूकीवरील जे काही भांडवली नफ्यावर कर आहे. त्याच्यावर देखील देखील परिणाम होऊ शकतो. आता राज्य सरकारने ५० टक्के कमी केला त्यामुळे खूप लोकांना याचा फायदा घेतला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न आलं आणि कर कमी केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कर भरणारे लोक देखील सहभागी होत असतात त्यामुळे उत्पन्न वाढते. कोरोना काळामध्ये नोकरदार वर्ग आणि सर्वसामान्य लोकांचं किंवा त्यामध्ये इन्कम टॅक्स पूर्ण होताना दिसत नाही. शेतकरी आणि मुंबई आणि महाराष्ट्रसाठी देखील मोठ्या प्रमाणावर अपेक्षा होती. कारण मुंबई, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर महसूल केंद्र सरकारला जात असतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात या अर्थसंकल्पात दिसून येत नाही, असेही शिंदे म्हणाले. महाविकास आघाडी सरकार असल्याने हात आखडता - सामंत महाराष्ट्रासाठी विशेष चर्चा होईल अशी अपेक्षा होती. मात्र, महाविकास आघाडी सरकार राज्यात असल्याने काही लोकांनी हात आखडता घेतला असल्याचे अर्थसंकल्पातून दिसते. समाधानकारक बाब म्हणजे उंची व तंत्र शिक्षण विभागाने राज्यात राबवलेली शिक्षण पद्धतीचे अनुकरण केंद्र शासनाने अर्थसंकल्पात केलेली आहे. डिजिटल युनिव्हर्सिटी निर्माण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. त्याची मुहूर्तमेढ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रोवली गेली आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले.
Last Updated : Feb 1, 2022, 5:35 PM IST