पिक विमा कंपन्यांनी ॲडव्हान्स रक्कम शेतकऱ्यांना परत द्यावी - अब्दुल सत्तार - मंत्री अब्दूल सत्तार जालन्यात
जालना - मराठवाड्यात ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या संदर्भात नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीकविमा कंपन्यानी या नुकसानीमुळे 25 टक्के अँडव्हान्स रक्कम शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. सत्तार यांनी आज (शनिवार) जालन्यातील बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर, अंबडगाव,बठाण, गोलापांगरी येथे जाऊन पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. पीकविमा कंपन्यांना कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्या संदर्भात आदेश देण्यात येणार आहेत. नुकसान भरपाई मिळण्याच्या आधी 25 टक्के अँडव्हान्स रक्कम पीकविमा कंपन्यानी शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे सत्तार यांनी म्हटले आहे.