अंगावर याल तर शिंगावर घेऊ, महापौर किशोरी पेडणेकरांचा भाजपाला इशारा - महापौर किशोरी पेडणेकरांबद्दल बातमी
मुंबई - महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवसेना भवन राडा प्रकरणी प्रतिक्रिया दीली आहे. अंगावर याल तर शिंगावर घेऊ, असा इशारा त्यांनी भाजपाला दिला. तुम्ही काहीही कराल आणि शिवसैनिक गप्प बसेल का? शिवसेना भवन येथील श्रद्धास्थानासमोर भाजपाच्या कोणत्यातरी एका पोराने उगाच ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला तो शिवसैनिकांनी हाणून पाडला आहे. शिवसेना भवनवर मोर्चा काढणे कितपत योग्य याचीही उत्तर द्यावीत, असेही त्या म्हणाल्या.