VIDEO : जालना अंबड येथील मत्सोदरी देवीचे मंदिर निघाले दिव्याने उजळून - Tripurari pournima
जालना - त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने जालना जिल्ह्यातील ग्रामदैवत असलेल्या अंबड येथील मत्स्योदरी देवीच्या मंदिरात गुरूवारी मोठ्या भक्ती भावाने दीप उत्सव साजरा करण्यात आला. मंदिराच्या चिरेबंध दगडी पायऱ्यांवर ११ हजार दिवे लावून हा दीप उत्सव साजरा करण्यात आला. आकरा हजार दिव्यांनी संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला. या वेळी जिल्ह्यातील ग्रामदैवत असलेल्या मत्स्योदरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने या ठिकाणी गर्दी ही केली. ११ हजार दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर परिसरातील आसमंत ही उजळून निघाला होता.