अहमदनगरमध्ये साकारला रांगोळीतून भारताचा नकाशा - independence day
अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील जनता विद्यालयाने रांगोळीतून भारताचा १५०×१०० फुटामध्ये नकाशा साकारला आहे. नेहमीच सामाजिक विषय असो किव्हा शासकीय या विषयाबाबत प्रबोधन करण्यासाठी डी.के.मोरे जनता विद्यालयातील विद्यार्थ्याची बैठक व्यवस्था अक्षरात अथवा बोध चिन्हात करत असतात. मात्र, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने रविवारी शाळेत मुले नसल्याने प्रांगणात 150 बाय 100 फुट अश्या आकारात भारताचा नकाशा काढण्यात आला आहे. दरवर्षी शाळेत मुले स्वातंत्र दिनी मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी शाळेत मुलांशिवाय स्वातंत्र दिन साजरा केला जात आहे. ही संकल्पना विद्यालयाचे कलाशिक्षक सत्यानंद कसाब व क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर यांच्या विचारातून पुढे आली.