बा विठ्ठला… 'कोरोनाचं संकट दूर होऊ दे'; मानाचे वारकरी कोंडीबा टोणगे यांचं विठुराया चरणी साकडं - Sunetra Pawar
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या प्रबोधिनी एकादशी महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक केली. यावेळी वारकरी भाविकांमधून नांदेड जिल्ह्यातील निळा सोनखेड वारकरी कोंडीबा देवराव टोणगे व प्रयागबाई कोंडीबा टोणगे यांना महापूजेचा मान देण्यात आला. कोंडीबा देवराव टोणगे व प्रयागबाई कोंडीबा टोणगे हे दाम्पत्य तीस वर्षापासून विठूरायाची आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होत आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे आषाढीची पायवारी खंडित झाली होती. मात्र, राज्य सरकारकडून विठुरायाचे मंदिर कार्तिकीवारी साठी खुले केले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत विठुरायाच्या पूजेचा मान मिळाल्यामुळे टोणगे दाम्पत्याने आनंद व्यक्त केला.