महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

पेट्रोल महाग, दारू स्वस्त ही संस्कृती कधी नव्हती - रवी राणा - Maharashtra had never seen expensive petrol and cheaper alcohol combination says ravi rana

By

Published : Nov 23, 2021, 1:49 PM IST

अमरावती : राज्य सरकारने मद्यावरील कर कमी केल्यावरून बडनेराचे आमदार रवी राणा यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल महाग आणि दारू स्वस्त अशी संस्कृती राज्यात कधीही नव्हती. मात्र उद्धव सरकारने ही संस्कृती लावल्याची टीका राणा यांनी केली. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी केला. मात्र महाराष्ट्र सरकारने पेट्रोल डिझेल वरील टॅक्स कमी न करता दारू वरील टॅक्स कमी करून दारू स्वस्त केली हे राज्याच दुर्भाग्य आहे असेही राणा म्हणाले. राज्य सरकारने पेट्रोल डिझेल स्वस्त करावं अशी मागणी त्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details