पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ईश्वराचा अंश - शिवराजसिंह चौहान - नरेंद्र मोदी कौतुक शिवराजसिंह चौहान
पणजी (गोवा) - 2014 पूर्वी भारताची जगात काही प्रतिष्ठा नव्हती. मात्र, नरेंद्र मोदी ( PM Modi ) पंतप्रधान झाल्यावर जगात भारताची ओळख बदलली, आणि मोदी आणि भारताचा जगात डंका वाजायला लागला, म्हणून मोदींनी दाही दिशात भारताचा विकास केला, म्हणून मोदी हे साधारण पुरुष नाही असाधारण मनुष्य आहे. किंबहुना ते ईश्वराचा अंश असल्याचे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान ( CM Shivraj Singh Chouhan comment on pm modi ) यांनी सांगितले. ते काल मंगळवारी मुरगाव तालुक्यात जाहीर सभेत बोलत होते.