लॉकडाऊन इफेक्ट : शेतीमाल पुरवठ्याची साखळी विस्कळीत; जळगावातील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान - कृषी उत्पादन वाहतुक
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनस्तरावरुन अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र, शासनाच्या सर्व आदेश आणि नियमांचे पालन खालच्या स्तरापर्यंत केले जात नाही. याचा विपरित परिणाम अनेक ठिकाणी होत आहे. अत्यावश्यक सेवेत शेतमाल वाहतुकीचा समावेश आहे. असे असतानाही अनेक ठिकाणी वाहतुकदारांना पोलिसांकडून मारहान अथवा नाहक त्रास सहन करावा लागतो. यामुळे तयार शेतमाल बाजारात जाऊ न शकल्याचे दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना लॉकडाऊनमुळे शेतीमाल पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.