VIDEO : वीज पडल्याने विठ्ठल मंदिराच्या कळसाचे घुमट फाटले - संग्रामपूर
बुलडाणा - शनिवारी रात्री बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, संग्रामपूर, शेगाव आदी तालुक्यात सुसाट वाऱ्यासह एक तास जोरदार पावसाने हजेरी लावली. यामध्ये अनेक गावांमध्ये नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने त्यांची तारांबळ उडाली. दरम्यान संग्रामपूर तालुक्यातील श्री विठ्ठल मंदिरावर वीज कोसळून मंदिराचा घुमट फाटल्याची घटना सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. या घटनेनंतर आवार गावाचे संकट विठ्ठलाने तारल्याची चर्चा गावभर होत असल्याचे दिसून आले. परतीचा पावसाचा तडाखा संग्रामपूर तालुक्याला बसला आहे. बऱ्याच शेतकरी बांधवांचे काढणीला आलेले सोयाबीन, कपाशी आणि इतर पिकांचे अतोनात नुकसान होणार आहे.