पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीला 'त्याने' दिले जीवदान; पाहा थरारक व्हिडिओ - Carried away in the flood waters in antora
अमरावती - हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार अमरावती जिल्ह्यात अनेक भागात आज (रविवार) मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्याना पूर आला. दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अमरावती तालुक्यातील अंतोरा गावातील रायगोय नदीला पूर आला होता. नदीच्या पुलावरून पाणी वाहत असतांना देखील अंतोरा येथील धनराज ससाणे हे पुलावरून दुसऱ्या काठावर जाण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी ते पुलावरून जात असताना त्यांचा पाय घसरून ते पुराच्या पाण्यात वाहून गेले. या गावातील सुनील खेडकर यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नदीतील पुरात उडी टाकून धनराज ससाने यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना जीवदान दिले. अंतोरा गावातील पूल हा सात वर्षांपूर्वी वाहून गेल्याने येथील सावंगावरून वाहतूक करावी लागते.