VIDEO : अमरावतीच्या महादेव खोरी परिसरात बिबट्याचा थरार - Leopard Found
अमरावती शहरातील महादेव खोरी परिसरात पुन्हा बिबट्या मुक्तसंचार करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. रवींद्र वैद्य यांच्या फार्म हाऊसच्या आवारात असलेल्या कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्रे पळून गेल्याने ते सुदैवाने बचावले. त्यानंतर मात्र दोन्ही कुत्र्यांनी पुन्हा बिबटयावर भूकंने सुरू केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. बिबट्याचा हा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यापूर्वीही अनेकदा या परिसरात लोकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे.